Dan Brown च्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांना पालथं घातलाय मी. सुप्रसिद्ध (किंवा वादग्रस्त) The Da Vinci Code पासून सुरुवात करून मग, Digital Fortress, Deception Point, Angels and Demons, The Lost Symbol, अगदी गेल्या दोन वर्षात आलेलं Inferno....... सगळे, (hard copy-soft copy) कसेही करून... The Da Vinci Code आणि Angels and Demons वर आलेले चित्रपट पाहून त्यावर माझी मतं सुद्धा देऊन झाली (नक्की पहावेत!). आणि Angels and Demons तर इतकं सुरेख होता, की मी मनापासून वाट बघतेय त्याच टीमतर्फे Deception Point वर असा किंवा अजून चांगला चित्रपट येण्याची.
मध्यंतरी पुन्हा एकदा योग आला काही वर्षापूर्वी वाचलेलं "Deception Point" परत वाचायचा. अर्थात ते एका रात्रीत वाचून संपवला गेलं. Dan Brownची सगळी पुस्तकं वाचल्यानन्तर मी अशा निष्कर्षाप्रत आले होते, Deception Point मला सगळ्यात जास्त आवडलंय. त्याचं पारायण केल्यावर आता माझं हे मत अगदी पक्कं झालंय.
तशी ही सगळीच fictions आणि सगळीच श्वास रोखायला लावणारी. अत्यंत रसभरीत कथानक आणि ते तितक्याच प्रभावीपणे पुढे नेणारी. Robert Langdon Adventure नसलेल्या Dan Brownच्या दोन्ही पुस्तकांना (Digital Fortress आणि Dception Point) स्वतःचा एक ठसा आहे. त्यातही, Deception Point एका वेगळ्या जगात घेऊन जाणारं. चर्च आणि symbology (चिह्नशास्त्र) बाहेरचं, अर्धवट माहित असलेलं जग, त्यामुळे डोळ्यासमोर प्रसंग यायला अगदी सोपं, पण तरीही त्यातला अज्ञात धडकी भरवणार.
मुळात मला पृथ्वीच्या धृवीय क्षेत्राचं अपार आकर्षण, त्यात जेव्हा Deception Point सारखं पुस्तक हातात पडत, तेव्हा पर्वणीच. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली note, की हे सगळं तंत्रज्ञान, या संस्था-संघटना, हे हुद्दे , अस्तित्वात आहेत; मला वाटत, अजून गंभीर करते आपल्याला.
(मला बायोलॉजी थोडंफार कळत असल्याने असेल कदाचित पण एकूणच) त्यातले सूक्ष्मजीवांचे, Bioluminiscence चे संदर्भ सुद्धा चटकन लक्षात येतात. डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राहू शकतात. (हा तर मला वाटतं, पुस्तक वाचनाचाच सगळ्यात आकर्षक भाग असतो)
नाही म्हणायला Goya दृष्यमान करायला जरा कठीण गेली मला. (Boat या प्रकाराच अज्ञान कारणीभूत असावं याला.)
कुठे एकही पात्र अनावश्यक येत नाही, किंवा जात नाही. अर्थात, Marjori Tench च जाण थोडं अनपेक्षित होतं मला.. म्हणजे "तिला का???" असं काहीसं.. पण प्रत्येक घटनेचा कथेत संदर्भ राहतो; आणि त्याहीपेक्षा मला महत्त्वाच वाटत म्हणजे कथा इतकी चित्तवेधक प्रकारे पुढे जात राहते की मागच्या घटनेचा संदर्भ जिथे असेल तिथे तो लक्षात यायला परत मागे जावं लागत नाही... (नाहीतर कधी कधी म्हणजे परत मग आधीचा प्रसंग वाचवा लागतो!) कथेचा ओघ सलग राहतो आणि आपण फक्त पुढेच सरकत राहतो.
सर्वाधिक अनपेक्षित आणि वेधक (नक्कीच अनुभवावी अशी गम्मत) म्हणजे नाव Deception Point असलं तरी प्रत्यक्ष Point of Deception सुद्धा कथेच्या ओघासह पुढे पुढे सरकत राहतो, बदलत राहतो......
Dan Brown म्हटलं की Robert Langdon ची साहसं सर्वात आधी डोळ्यापुढे येतात. Symbology हे या कथांचं बलस्थान. पण बलस्थान सोडून बांधलेली Dan Brown ची ही कथा मात्र अतिशय खिळवून ठेवणारी आणि म्हणूनच आवर्जून वाचावी अशी.